जालना - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून(२९मे) ते 31 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांमुळे ही संख्या वाढत असल्याचे समोर आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
जालन्यात तीन दिवसांची कडक संचारबंदी; शहरांतून परतणाऱ्या नागरिकांमुळे संख्येत भर
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आजपासून(२९मे) ते 31 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांमुळे ही संख्या वाढत असल्याचे समोर आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आजपासून(२९मे) ते 31 मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
संचारबंदीमुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य आहेत. खतं, बी-बियाणे आणि औषधे या महत्त्वाच्या दुकानांव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद आहेत. शहरातील बाधितांच्या आकड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने तातडीची पावले उचलली असून बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्यातची प्रक्रिया सुरू आहे.