महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : पारध बुद्रुक येथे कोरोना रुग्ण आढळल्याने तीन दिवस जनता कर्फ्यू

भोकरदन तालुक्यातील पारध बु. या गावातही एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा पर्याय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. तसेच, या नियमांचे पालन न केल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहनही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहेत.

पारध बुद्रुक येथे कोरोना रुग्ण आढळल्याने
पारध बुद्रुक येथे कोरोना रुग्ण आढळल्याने

By

Published : Jul 22, 2020, 3:45 PM IST

जालना : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे एक कोरोना रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे आज(बुधवार) रोजी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे.

जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळून आहेत. भोकरदन तालुक्यातील पारध बु. या गावातही एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा पर्याय म्हणून प्रशासनाने सर्व नागरिकांना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. या नियमाचे उंलघन केल्यास दंडाअत्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी मास्क किंवा रुमाल न वापरल्यास 500 रु दंड तसेच, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यास 1000 रु दंड करण्यात येईल, असे पारध ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी गजानन उंबरकर यांनी सांगितले आहे.

गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत भोकरदन यांनी पारध बुद्रुक या ठिकाणी भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन उपाययोजना करण्या संदर्भात सुचना केल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावात धुर फवारणी सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details