जालना : जिल्ह्यात अंबड तालूक्यात जामखेड नावाचे एक गाव आहे. बारा वाड्या, तेरावे जामखेड अशी या भागाची ओळख आहे. या तेरा गावांत सुरवातीपासून कोठेही हनुमंताचे मंदिर नाही, कोठे फोटो ही दिसत नाही. या गावातील नागरिक हनुमानाची पुजा, आराधनाही करत नाही. कारण या गावातील नागरिकांचा आदिदेव जाम्बुवंत आहे. जाम्बुवंत हे हनुमानाचा मोठे भाऊ आहेत. जामखेड येथे गावाच्या उत्तरेला डोंगरावर त्यांचे मंदिर आहे.
हनुमानाचे मोठे भाऊ जाम्बुवंतांचे मंदिर ब्रम्हदेवाचे मानसपुत्र :जालना, छत्रपती संभाजीनगर पासून साधारण 45 किलोमिटर अंतरावर जामखेड गावापासून 2 किलोमिटरवर हे मंदिर आहे. त्याला जाम्बुवंत गडी म्हणुनही ओळखले जाते. या भागात जोगेश्वरवाडी, बक्षाचीवाडी, किनगाववाडी, निहालसिंगवाडी पागिरवाडी, लेंभेवाडी, ळेवाडी, भोकरवाडी, कौचलवाडी, विठ्ठलवाडी, नारळेवाडी, कोंबडवाडी, या बारा वाड्या आहेत या बारा वाड्यांमधे फक्त जाम्बुवंत महाराजांची पुजा केली जाते. सर्व जगाची निर्मिती करणारे ब्रम्हदेव जेव्हा मानवाची निर्मिती करत होते, तेव्हा त्यांना अचानक जांभई आली. त्यातुन जाम्बुवंतांचा जन्म झाल्याची अख्यायीका आहे. ते अस्वल रुपात प्रकटले, पण ब्रम्हदेवांपासून त्यांची उत्पत्ती झाल्यामुळे त्यांना त्यांचा मानस पुत्र मानण्यात येते.
रामाचे निस्सिम भक्त : त्यांच्या बद्दल रामायण, अनेक ग्रंथात उल्लेख सापडतो. जाम्बुवंतांची ओळख श्रीरामाचा निस्सिम भक्त अशी आहे. प्रभु राम यांना ते सल्लाही द्यायचे असे, सांगितले जाते. या जाम्बुवंतांनी रावणाला हरवुन श्री राम सगळ्यांसोबत वापस आले, तेव्हा रामाने सगळ्यांना काय हवे हे विचारले. तेव्हा जाम्बुवंतांनी मला एकांत असलेली जागा तपश्चर्येसाठी हवी आहे, असे सांगितले. तेव्हा प्रभुरामाने त्यांना हा परिसर दिला अशीही अख्यायीका आहे. या टेकडी निजीक एक प्राचिन गुहेचे अवशेष आजही सापडतात. 1992 च्या सुमारास भक्तांनी लोकवर्गणीतुन या मंदिराचा जिर्नोद्धार केला. या मंदिर परीसरात एक गणपतीचे, एक महादेवाचे मंदिर असुन मोठा सभा मंडप उभारण्यात आला आहे. त्यानंतर आतल्या भागात गेल्यावर एक गुहे सारखे मंदिर आहे. तेथुन वाकून आत गेल्या नंतर तेथे जाम्बुवंतांचे दर्शन होते.
जाम्बुवंत महाराजांची आराधना : शुक्रवार, महत्वाच्या सणांना येथे भाविकांची गर्दीही असते. येथे यात्राही भरवली जाते. राज्यभरातून तसेच बाहेरच्या राज्यातुनही भाविक येथे भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. हा भाग जाम्बुवंत टेकडी, जाम्बुवंत गुहा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जातो. हजारो वर्षापासून पंचक्रोशितील भाविक आपली पुरातन परंपरा जपत जाम्बुवंत महाराजांची आराधना करत आहेत.
हेही वाचा - Hanuman Jayanti 2023 : रामायण कालीन हनुमानाला 26 राज्यातील विशेष पदार्थांचा नैवैद्य