महाराष्ट्र

maharashtra

तृतीयपंथीयांनाही सन्मान मिळावा - सोनाली शेख

By

Published : Oct 21, 2019, 5:14 PM IST

तृतीयपंथी सोनाली शेख हिने पहिल्यांदाच जालना शहरातील राजवाडा भागात असलेल्या मतदान केंद्र 175 येथे मतदान केले. आपण फक्त मतदानच केले नाही, तर यापुढे आपण तृतीयपंथीयांना मतदान करण्यासाठी जागृत करणार आहोत.

तृतीयपंथीयांनाही सन्मान मिळावा - सोनाली शेख

जालना - सामान्य माणसांप्रमाणेच आम्हालाही ही सन्मान मिळावा, आम्हालाही सर्व हक्क मिळावेत, अशी भावना जालना विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच मतदान केलेल्या तृतीयपंथी मतदार सोनाली शेख हिने व्यक्त केली आहे.

तृतीयपंथीयांनाही सन्मान मिळावा - सोनाली शेख

हेही वाचा -पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; सहा जण जखमी

तृतीयपंथीयांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांच्यावर हसतात देखील, अशा प्रकाराने व्यथित झालेल्या तृतीयपंथी सोनाली शेख हिने पहिल्यांदाच जालना शहरातील राजवाडा भागात असलेल्या मतदान केंद्र 175 येथे मतदान केले. आपण फक्त मतदानच केले नाही, तर यापुढे आपण तृतीयपंथीयांना मतदान करण्यासाठी जागृत करणार आहोत. असेही सोनाली म्हणाली. जालना शहरांमध्ये तृतीयपंथीयांची सुमारे 25 ते 30 संख्या आहे. या सर्वांना पुढील मतदानाच्यावेळी मतदान करण्यासाठी भाग पाडू आणि त्यांची नावे मतदान यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्यांप्रमाणे आम्हालाही सन्मान मिळावा, हीच एक अपेक्षा आहे. पहिल्यांदाच केलेल्या मतदानामुळे खूप आनंद होत असल्याची भावनाही सोनाली शेख हिने व्यक्त केली.

हेही वाचा -बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन गटात हाणामारी

ABOUT THE AUTHOR

...view details