महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'येणारे धार्मिक उत्सव घरातच साजरे करा' - शब -ए- बारात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 ते 14 एप्रिल दरम्यान येणारे सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आपापल्या घरी साजरे करण्याचे आवाहन बदनापूर येथील सर्व सामाजिक स्तरातून करण्यात येत आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Apr 8, 2020, 12:49 PM IST

जालना- कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. जालना शहरातही एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून दिनांक 7 ते 14 एप्रिल दरम्यान येणारे सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आपापल्या घरी साजरे करण्याचे आवाहन बदनापूर येथील सर्व सामाजिक स्तरातून करण्यात येत आहे.

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असून त्या पार्श्वभूमीवर भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन व संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे. या संचारबंदी काळात कोणत्याही धार्मिक व सामाजिक उत्सवास परवानगी देण्यात येत नाही. 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान चार धार्मिक उत्सव आहेत. 8 एप्रिल रोजी हनुमान जयंती व शब -ए- बारात, 10 एप्रिल रोजी गुड फ्रायडे तर 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असे उत्सव या दरम्यान हेात आहे.

दरवर्षी हे उत्सव मोठया उत्साहात साजरे होत असतात. यंदा मात्र कोरोनाचा प्रसार राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामउळे धार्मिक व सामाजिक उत्सव घरात व कुटुंबियासोबत साजरे करावे, असे आवाहन सामाजिक संस्थानी केले आहे. जेणेकरून गेल्या तेरा दिवसांपासून घेत असलेले परिश्रम वाया जाऊ नये या उद्देशाने बदनापूर तालुक्यातील धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी सदर सण घरात साजरे करून कोरोनाला पराजित करावे असे आव्हान केले आहे.


सध्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाने गर्दी न जमविण्याचा सूचना दिलेल्या असल्याने ८ एप्रिल रोजी होणारी शब-ए- बारात मुस्लीम बांधवानी घरातच साजरी करावी, घरात नमाज अदा करून कुरानचे वाचन व प्रार्थना करावी, कोणी ही मस्जिदमध्ये येऊन गर्दी करू नये, असे आवाहन जामा मस्जिदचे अमीर हाजी सय्यद चांद यांनी केले.

दरवर्षी बदनापूर तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. परंतु, सध्याची परिस्थिती तशी नाही कोरोनाशी आम्ही सर्वजण लढा देत असून लॉकडाऊन मध्येही अनेक दिवसापासून आपण सर्व घरातच थांबत आहे. त्याच प्रमाणे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असून आतापर्यंतचे प्रयत्न वाया जाऊ नये. म्हणून डॉ.आंबेडकर जयंती सर्व बांधवानी घरातच साजरी करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन दलित मित्र सांडुजी कांबळे यांनी केले.

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना एकत्र येण्यावर बंदी आहे. विशेष म्हणजे शासन हे सर्व आपल्यासाठी करीत असल्याने नागरिकांनी यंदा हनुमान जयंती घरातच साजरी करून कोरोनापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी केले.

कोरोनामुळे जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशाने जमावबंदी आदेश लागू केलेला असून ८ ते १५ दरम्यान विविध धार्मिक सण आलेले असल्याने आणि शासनाने हे सण घरातच साजरे करण्याचे निर्देश दिलेले आहे. जेणेकरून आपला कोरोना लढा यशस्वी होण्याच्या दृष्टीने मदत होईल तरी बदनापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उपरोक्त कालावधीमध्ये येणारे सण घरातच साजरे करून सहकार्य करावे, असे आवाहन बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर यांनी केले.

हेही वाचा -'अन्न अमृत'ने भागवली 35 हजारांहून अधिक जणांच्या पोटची भूक

ABOUT THE AUTHOR

...view details