जालना- येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयातून रात्री जन्मलेल्या बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली ( Baby Stolen ) आहे. रुकसाना अहेमद या महिलेला रविवारी (दि. 7 फेब्रुवारी) प्रसूतीसाठी शासकीय रुगणलायत ( Government Hospital in Janla ) दाखल करण्यात आले होते. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास रुकसाना या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सकाळी एका महिलेने तिचे बाळ पळवून नेले. या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सकाळी एका महिलेने बाळाला गरम पाण्याने आंघोळ घालते म्हणून बाळास घेतले त्यावेळी रुकसाना यांच्या जाऊ नसरिनही सोबत होत्या. बाळाला अंघोळ घातल्यानंतर त्याचे कपडे धुण्यासाठी नसरिन या खाली गेल्या त्यावेळी बाळाला उन दाखवते म्हणून त्या महिलेने बाळाला घेतले. दरम्यान, नसरिन यांना फोन आला व ते रुकसाना यांना फोन देण्यात गेल्या. यावेळी ती महिला बाळाला घेऊन पळून गेली. नसरिन यांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती महिला दिसली नाही.