महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदीचा गुटखा विकण्यासाठी विक्रेत्यांना दिली जातेय लालूच - गुटखा विक्रेत्यांना लालूच

महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विकण्यासाठी विक्रेत्यांना लालूच दिली जात असल्याचे उघड झाले आहे. जालन्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या ७ लाख ११ हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची चौकशी करताना ही माहिती समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.

महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विकण्यासाठी विक्रेत्यांना लालूच दिली जात असल्याचे उघड झाले

By

Published : Aug 9, 2019, 10:20 PM IST

जालना - महाराष्ट्रात बंदी असलेल्या सात लाख अकरा हजार रूपये किंमतीच्या गुटख्याची मंगळवारी होळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. हा गुटखा विक्रीसाठी ठोक विक्रेत्यांपासून किरकोळ विक्रेत्यांना विविध प्रकारची लालूच दाखविली जाते, हे या प्रकरणाच्या चौकशीमध्ये उघडकीस आले.

महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा विकण्यासाठी विक्रेत्यांना लालूच दिली जात असल्याचे उघड झाले
प्रीमियम राज निवास सुगंधित पान मसाला म्हणजेच गुटखा, विकण्यासाठी ठोक विक्रेत्याला 'स्र्कॅच अँड विन' नावाचे कुपन गोणीमध्ये टाकले जाते. हे कुपन परत केल्यानंतर त्याला दोनशे रुपये मिळतात. हीच पद्धत किरकोळ विक्रेत्यासाठी देखील लागू आहे. परंतु त्याच्या पाकिटामध्ये २० रुपयांचे कुपन निघते. यावरून हा गुटखा विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लालूच दाखवली जाते हे लक्षात येते. पाकिटांवर दिल्ली येथील पत्ता असला तरी कर्नाटकमार्गे हा गुटखा महाराष्ट्रात येत आहे. काल (गुरूवार) घनसांवगी तालुक्यातील राणी उचेगाव येथे गुटखा सापडला. त्यामुळे बंदी असलेला गुटखा मराठवाड्यात सर्वत्र मिळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी सापडलेल्या गुटख्याच्या गोणीमधील स्र्कॅच कुपनवर या कुपनचा फायदा घेण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019 आहे. गुटखा वापरावयाचा कालावधी पॅकिंग केल्यापासून सहा महिन्यांचा आहे. याचा अर्थ हा गुटखा नुकताच तयार करून विक्रीसाठी जालन्यात आला आहे. पोलीस अधीक्षक चैतन्य, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रावसाहेब नाईक, यांच्या उपस्थितीत हा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला. त्यापुर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात हा गुटखा जमा करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details