जालना- येत्या गुरूवारी म्हणजेच १२ तारखेला गणेश विसर्जन असल्याने त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने विसर्जनाच्या पूर्व तयार करण्यात येते. त्या पूर्व तयारीची पाहणी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
जालन्यात गणेश विसर्जनाची जय्यत पूर्वतयारी; मुख्याधिकार्यांनी केली पाहणी - Ganesh visarjan jalna
येत्या गुरूवारी म्हणजेच १२ तारखेला गणेश विसर्जन असल्याने त्या पार्श्वभूमीवर नारपालिकेच्या वतीने विरसर्जनाच्या पूर्व तयार करण्यात येते. त्या पूर्व त्यारीची पाहणी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सुरक्षिततेत कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील मोतीबाग तलावाजवळ चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने तलावाचा काही भाग यात गेला आहे. त्यामुळे तलावाचा भाग कमी झाला आहे. यंदा कमी पावसामुळे तलावा पुरेसे पाणी नसल्याने मोठ्या गणेश मूर्तांसाठी तलावात पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहने कोणत्या दिशेने येतील आणि परत जातील याचेही नियोजन करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. पूर्वी घरगुती गणपती तसेच लहान गणेश मूर्तींचे विसर्जन मुक्तेश्वर तलावामध्ये करण्यात येत होते. परंतु, या तलावात सध्या विसर्जनास बंदी असल्याने मोतीबागेलगतच लहान कृत्रीम हौदाची सोय करण्यात आली आहे. पाहणीवेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी केशव कानगुडे, बांधकाम अभियंता सौद, नगरसेवक मेघराज चौधरी हे उपस्थित होते.