महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निर्बंध, रात्रीच्या संचारबंदीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील - आरोग्य मंत्री राजेश टोपे - संचारबंदी राजेश टोपे माहिती

राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली नाही. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. काल पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एकही ओमायक्रॉन बाधित रुग्ण नाही. चिंता करू नका. राज्य शासनाने केलेले नियम पाळून गर्दी टाळा, तरच कोरोना नियंत्रित करता येईल, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) म्हाणाले.

Chief Minister will decide on the restrictions
संचारबंदी राजेश टोपे माहिती

By

Published : Jan 8, 2022, 4:09 PM IST

Updated : Jan 8, 2022, 4:43 PM IST

जालना - राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली नाही. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. काल पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एकही ओमायक्रॉन बाधित रुग्ण नाही. चिंता करू नका. राज्य शासनाने केलेले नियम पाळून गर्दी टाळा, तरच कोरोना नियंत्रित करता येईल. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे जे निर्बंध लावता येईल ते लावण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Minister Rajesh Tope ) म्हणाले. ते जालन्यात बोलत होते.

माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

हेही वाचा -सीएसएमटी-कुर्ला स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना निनावी फोन; आरोपीला जबलपूर येथून अटक

रात्रीच्या संचारबंदी बाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील

राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांकडे विविध प्रस्ताव येत असतात, त्यामुळे निर्बंधाबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे जे निर्बंध लावता येईल ते लावण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. रात्रीच्या संचारबंदी बाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही टोपे यांनी सांगितले. हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांची सरकारला काळजी आहे. त्यामुळे, विचारपूर्वकच निर्बंधाबाबत निर्णय घेतले जातीलय, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ओमायक्रॉनचा पुढील प्रकार अत्यंत धोकादायक राहील, असा इशारा केंब्रिजच्या प्राध्यापकांनी दिला आहे. मात्र, यावर निष्कर्ष समोर येई पर्यंत बोलणे उचित होणार नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत असेल तर, लगेचच त्यांच्या चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहे. 10 जानेवारीपासून राज्यात 60 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यांपैकी जी लस दिली असेल, त्याच कंपनीचा बुस्टर डोस दिला जाईल, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. सध्या लहान मुलांबरोबच ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायचे आहे. त्यामुळे कोविशिल्डचे 60 लाख डोस कमी पडत असून कोव्हॅक्सिनच्या 40 लाख लसी कमी पडत आहे. या संदर्भात केंद्राकडे मागणी केली असून लवकरच या लसी राज्य सरकारला मिळेल, असा विश्वास देखील आरोग्य मंत्री टोपे यांनी व्यक्त केला.

1996 रुग्णांपैकी 96 टक्के लोकांनी लसीकरण न केल्यानेच ते बाधित - टोपे

हाय रिस्क देशांबरोबरच आता प्रत्येक देशातून राज्यातील विमानातळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 7 दिवस कवारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेल्या 1 हजार 996 रुग्णांपैकी 96 टक्के रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. पालिका आयुक्तांनी ही माहिती दिली. 96 टक्के लोकांनी लसीकरण न केल्यानेच ते बाधित झालयाचे टोपे म्हणाले. त्यामुळे, नागरिकांनी लसीच्या बाबतीत टाळाटाळ करू नये, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोलनूपिरावीर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे असून त्याच्या किमती कमी करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. याबाबत सकारत्मक अश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल आहे. विलगीकरणाबाबत मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळ्या दिवसांचे अंतर आहे. दरम्यान आयसीएमआर ( ICMR ) च्या सूचनेप्रमाणे राज्यभरात सर्वांना केवळ 7 दिवस विलगीकरण करण्यात यावे अशी सूचना ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -Mumbai Mayor On Corona : मुंबई डेंजर झोनच्या बाहेर, मात्र काळजी घ्या - किशोरी पेडणेकर

Last Updated : Jan 8, 2022, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details