महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' मृतदेहाची ओळख पटली - जालना शहर बातमी

भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी (दि. 29 जाने.) एका शेतातील विहिरीत सडलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांची तपासानुसार हा मृतदेह कुंभारी गावाततील सुनिल एकनाथ दळवी (वय 49) याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jan 30, 2021, 10:43 PM IST

जालना (भोकरदन) - भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी (दि. 29 जाने.) एका शेतातील विहिरीत सडलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांची तपासानुसार हा मृतदेह कुंभारी गावाततील सुनिल एकनाथ दळवी (वय 49) याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कुंभारी शिवारातील रविंद्र सहाने यांच्या शेतातील विहीरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडले होता. भोकरदन पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र, मृतदेहाच्या उजव्या हातावर नाव गोंधलेल असल्याने मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली असून, हा मृतदेह कुंभारी गावाततील सुनिल एकनाथ दळवी याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भोकरदन पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा -भोकरदन तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार

ABOUT THE AUTHOR

...view details