महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरमधील अत्याचाराच्या घटनेचे जालन्यात पडसाद - BHOKARDAN PROTEST NEWS

जालन्यातील गांधीचमन परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 रोजी बालिकेला श्रद्धांजली अर्पण करून शासना विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्या नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येऊन लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अत्याचाराच्या घटनेचे जालन्यात पडसाद
अत्याचाराच्या घटनेचे जालन्यात पडसाद

By

Published : Jan 23, 2021, 11:14 AM IST

जालना -भोकर तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील सालगड्याने पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने खून केल्यानंतर मुलीचा मृतदेह शेताशेजारी असलेल्या सुधा नदी पात्रात फेकून दिला होता. या घटनेचे पडसाद जालन्यातही उमटले.

भोकरमधील अत्याचाराच्या घटनेचे जालन्यात पडसाद

अभाविपच्या वतीने निषेध
जालन्यातील गांधीचमन परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 रोजी बालिकेला श्रद्धांजली अर्पण करून शासना विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्या नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येऊन लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावी एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. मात्र अद्याप त्या नराधमावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. घडलेला प्रकार हा मानवजातीला काळीमा फासणारा आहे. त्याचा संताप म्हणून राज्यात विविध ठिकाणी अशा या घटनेच्या निषेधार्थ निषेध केला जात आहे.
हेही वाचा -चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कट, सिंघू सीमेवरून संशयीत ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details