जालना -घनसावंगी तालुक्यातील दही येथे सन 2003 मध्ये गायरान जमिनीवरून खून झाला होता. या खुनातील आरोपी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. हा आरोपी 2011 मध्ये रजा घेऊन आल्यानंतर फरार झाला होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांनंतर शनिवारी (दि. 26 डिसें.) अटक केली आहे.
रजेवर आला तो परत गेलाच नाही
घनसावंगी तालुक्यातील दाही येथे सन 2003 मध्ये गायरान जमिनीवरून वाद झाले होते. या प्रकरणात हाणामारी होऊन खूनही झाला होता. या खुनातील आरोपी काशिनाथ पुंजाराम लहाने (वय 58 वर्षे) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहामध्ये ही शिक्षा भोगत असताना त्याला 2011मध्ये पॅरोल रजा मंजूर करण्यात आली. यादरम्यान तो दाही या आपल्या गावी आला. मात्र, नंतर परत गेलाच नाही. तेव्हापासून आरोपी विविध ठिकाणी आपली नावे बदलून राहत होता.