महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2019, 6:45 PM IST

ETV Bharat / state

मंठा पंचायत समितीतील लाचखोर कनिष्ठ यांत्रिक एसीबीच्या जाळ्यात

या प्रकरणातील तक्रारदाराची मंठा तालुक्यातील मौजे नानसी गावच्या शिवारात शेती आहे. तसेच याच शेतात एक विहीर आहे. या विहिरीला चांगले पाणी असल्यामुळे मागील वर्षी पाणी टंचाईच्या काळात उपविभागीय अधिकारी यांनी सदर विहीर अधिग्रहित केली होती. 88 दिवस अधिग्रहीत केलेल्या विहिरीला 600 रुपये प्रतिदिन याप्रमाणे 52 हजार 800 रुपयांचे बिल तयार झाले होते. हे बिल तक्रारदाराने पंचायत समितीमध्ये सादर करून पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ यांत्रिक सुधीर पैठणकर यांना धनादेश काढण्याची विनंती केली. हा धनादेश काढण्यासाठी पैठणकर यांनी 1 हजार रुपयांची लाच मागितली.

लाच

जालना- दुष्काळाच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समितीने अधिग्रहीत केलेल्या विहिरीचे बिल काढण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मंठा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सुधीर सदाशिवराव पैठणकर, असे या कनिष्ट सहायकाचे नाव आहे.

हेही वाचा - जालना पोलीस शांतता अन् सलोख्यासाठी सज्ज

या प्रकरणातील तक्रारदाराची मंठा तालुक्यातील मौजे नानसी गावच्या शिवारात शेती आहे. तसेच याच शेतात एक विहीर आहे. या विहिरीला चांगले पाणी असल्यामुळे मागील वर्षी पाणी टंचाईच्या काळात उपविभागीय अधिकारी यांनी सदर विहीर अधिग्रहित केली होती. 88 दिवस अधिग्रहीत केलेल्या विहिरीला 600 रुपये प्रतिदिन याप्रमाणे 52 हजार 800 रुपयांचे बिल तयार झाले होते. हे बिल तक्रारदाराने पंचायत समितीमध्ये सादर करून पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ यांत्रिक सुधीर पैठणकर यांना धनादेश काढण्याची विनंती केली. हा धनादेश काढण्यासाठी पैठणकर यांनी 1 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

हेही वाचा - जालन्यात पावसाने आणली 60 टक्के पिकाला अवकळा

या तक्रारीच्या आधारे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबरला अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष जाऊन तक्रारीची शहानिशा केली असता, त्यामध्ये तथ्य आढळले. त्यानुसार शुक्रवारी पंचायत समिती कार्यालय मंठा येथे तक्रारदाराकडून 1 हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ यांत्रिक पैठणकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details