जालना- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक कोरोना बाधितांची संख्या समोर येत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी जालना शहरातील दुखी नगर भागात राहणारी महिला कोरोना पॉझिटिव्ह आली. ही महिला घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे तिच्या मुलीकडे गेली होती. मुलगी शाळेत शिक्षिका आहे. तर या शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नधान्य वाटप केले होते. त्यामुळे रांजणी गाव होम क्वारंटाईन केले आहे.
जालन्यातील 'त्या' शिक्षिकेचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह - कोरोना महाराष्ट्र अपडेट बातमी
शिक्षिकेचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आज बुधवारी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तो निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे प्रशासनासह जालनेकारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. परंतु, प्रशासनाने खबरदारी म्हणून शहरातील श्री महावीर स्थानकवासी जैन इंग्लिश शाळेच्या बस ताब्यात घेतल्या आहेत. याचा वापस रुग्णवाहिका म्हणून करण्यात येणार आहे.
teachers-medical-report-negative-in-jalna
हेही वाचा-Global Covid-19 Tracker : जगभरात कोरोनामुळे 82 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
तर शिक्षिकेचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आज बुधवारी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तो निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे प्रशासनासह जालनेकारांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. परंतु, प्रशासनाने खबरदारी म्हणून शहरातील श्री महावीर स्थानकवासी जैन इंग्लिश शाळेच्या बस ताब्यात घेतल्या आहेत. याचा वापस रुग्णवाहिका म्हणून करण्यात येणार आहे.