जालना- बदनापूर तालुक्यात असलेल्या स्थलांतरीत मजुरांना लॉकडाऊनमुळे काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. काही स्वयंसेवी संस्था व तहसील प्रशासनाने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यामुळे या मजुरांची उपासमार थांबली आहे. बदनापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गाचे काम सुरू होते. मात्र, अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे चिखली, डोंगरगाव या ठिकाणी 20 कुटुंब अडकले.
बदनापूर तालुक्यात स्थलांतरीत मजुरांना अन्नधान्याचे वाटप, शिक्षकांचा पुढाकार - जालना लॉकडाऊन
बदनापूर तालुक्यात असलेल्या स्थलांतरीत मजुरांना लॉकडाऊनमुळे काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहीला आहे. काही स्वयंसेवी संस्था व तहसील प्रशासनाने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यामुळे या मजुरांची उपासमार थांबली आहे.
सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजूरांवर उपासमारीचे संकट आले हेाते. परंतु चिखली येथील शिक्षक महेश देशपांडे यांना हा प्रकार समजताच त्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या व्हाटसॲप ग्रुपवर याबाबतीत माहिती दिली. जालना येथील व परिसरातील शिक्षकांनी डब्बे आणून या कुटंबाना वाटप केले. परंतु रोज दोन वेळ डब्बे देण्यास अडचणी येत असल्यामुळे या सर्वांनी वर्गणी जमा करून या ठिकाणी या मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे पॅकट वाटप केले.
याबाबत तहसीलदार छाया पवार यांनाही कळविण्यात आले. त्यांनीही गहू, तांदूळ, डाळ व तेल या ठिकाणी वाटपासाठी पाठवले. तसेच तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील केळीगव्हाण व देवगाव येथील स्थ्लांतरीत मजुरांना ते रहात असलेल्या ठिकाणी अन्नधान्याचे वाटप केले आहे. या बाबत तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले की, तालुक्यात ज्या ठिकाणी असे मजूर असतील त्याची माहिती संबंधित तलाठी, पोलिस पाटील व सरपंच यांच्याकडून मागवण्यात येत आहे व तहसील प्रशासन व स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून त्यांना जीवनाश्वयक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पायी जाणारे काही नागरिक असतात त्यांनाही जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.