जालना- दहावी-बारावीच्या परीक्षेमधील होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, तरीही प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार घडत आहे. जालन्यात शिक्षकानेच प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. परतूर येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात हा प्रकार समोर आला आहे.
जालन्यात शिक्षकानेच फोडली बारावीची प्रश्नपत्रिका, 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
शिक्षक दिनेश अंकुशराव तेलगड (वय 34) यांनी हिंदीचा पेपर सुरू असतानाच परीक्षा हॉल क्रमांक 20 मधील पर्यवेक्षकासमोरच हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून घेतला. परीक्षा केंद्राच्या बाहेर जाऊन उत्तरपत्रिका तयार केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षक दिनेश अंकुशराव तेलगड (वय 34) यांनी हिंदीचा पेपर सुरू असतानाच परीक्षा हॉल क्रमांक 20 मधील पर्यवेक्षकासमोरच हिंदीच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून घेतला. परीक्षा केंद्राच्या बाहेर जाऊन उत्तरपत्रिका तयार करून त्याचे कृष्णा चव्हाण (19) याच्या झेरॉक्स मशीनमध्ये उत्तरपत्रिकेचे झेरॉक्स काढले.
त्यानंतर तेलगड यांनी सहकारी रामेश्वर बाबासाहेब काळे (वय 22), विश्वंभर शंकरराव (पाष्टे 19 डोलारा), श्याम दत्तात्रय उबाळे (वय 18, कुंभार गल्लीच्या मागे परतुर), शुभम सुधाकर मुळे (वय 18, बाबुल्तारा) ज्ञानेश्वर सुंदरराव माने (वय 18, माने गल्ली परतुर) यांच्या मदतीने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका देण्यात आली. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.