जालना- चंदनझिरा पोलीस ठाण्यांतर्गत एका महिलेच्या घरातून पोलिसांनी दोन धारदार शस्त्र जप्त केली आहेत. महिलेच्या घरातून तलवार आणि खंजीर जप्त करण्यात आली आहेत. शारदाबाई महादू कांबळे (वय 30 वर्षे, रा. सुंदर नगर), असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
कपाटात ठेवली होती शस्त्रे
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सुंदर नगर येथील पवार गोडाऊन गल्ली भागातील एका महिलेच्या घरी आज (दि. 4 नोव्हेंबर) छापा मारला. या छाप्यामध्ये महिलेने कपाटात लपवून ठेवलेली दोन शस्त्रे सापडली. यामध्ये 48 सेंटीमीटर लांब असलेली आणि लाल रंगाच्या मॉनमधील एक धारदार तलवार आणि काळा पांढऱ्या रंगाच्या म्यानमध्ये ठेवलेले 35 सेंटीमीटर लांबीचे एक खंजीर पोलिसांना सापडले. याविषयी महिलेकडे अधिक चौकशी केली असता दुसऱ्या एका व्यक्तीने ही शस्त्रे ठेवण्यासाठी सांगितली असल्याचे सांगितले.
दुसरा आरोपी फरार