जालना - सध्या राज्यात असलेली राजकीय परिस्थिती ही, शिवसेना आणि भाजप युतीला लायकीपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे उद्भवली आहे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केले. शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी ते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी ते जालन्यात बोलत होते.
युतीला लायकीपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे ही परिस्थिती - राजू शेट्टी - राजू शेट्टींची भाजप शिवसेनेवर टीका
सरकार स्थापन होत नाही, ही दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. शिवसेना आणि भाजप युतीने मंत्रिपदाचे वाटप अगोदरच का ठरवले नाही? आणि आता या पदासाठी दोघेही भांडत आहेत.
हेही वाचा -'कर्जमाफीस पात्र म्हणून सत्कार झाला, पण कर्जमाफी झालीच नाही'
सरकार स्थापन होत नाही, ही दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. शिवसेना आणि भाजप युतीने मंत्रिपदाचे वाटप अगोदरच का ठरवले नाही? आणि आता या पदासाठी दोघेही भांडत आहेत. खरेतर त्यांच्या लायकीपेक्षा जास्त जागा दोघांनाही मिळाल्यामुळे हे भांडण सुरू आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, हा तिढा सोडविण्यासाठी आणि भाजप-शिवसेना युतीची सरकार स्थापन होत नसेल तर विरोधी पक्षाने सत्तास्थापनेसाठी पुढे यावे, शेवटी जनतेने तरी किती दिवस काळजीवाहू सरकारवर अवलंबून राहायचे, असेही ते म्हणाले.