महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 8, 2019, 3:23 PM IST

ETV Bharat / state

जालन्यात पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थिनींचा पुढाकार

पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास लक्षात घेऊन श्री सरस्वती भूवन प्रशालेच्या विद्यार्थिनींनी याबाबत जनजागृतीची मोहीम राबवली आहे. या मोहिमेत दसऱ्याला सोनेरूपी आपट्याची पाने न वाटता त्याजागी कागदाची फुले किंवा नैसर्गिक फुले वापरण्याचा संदेश या विद्यार्थिनींनी दिला आहे.

पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थिनींचा पुढाकार

जालना - दिवसेंदिवस झाडांची घटत जाणारी संख्या आणि त्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी येथील श्री सरस्वती भूवन प्रशालेच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला असून सध्या ते जनजागृती करत आहेत.

पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थिनींचा पुढाकार

प्रशालेचे मुख्याध्यापक डी.आर. पाटील, उपमुख्याध्यापक एस. यु. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक व प्रकल्प प्रमूख संतोष जोशी यांनी ही संकल्पना राबविली आहे. शाळेतील विद्यार्थिनींच्या मार्फत पोस्टरच्या माध्यमाद्वारे विविध घोषवाक्य लिहून प्रथम शाळेमधील वर्गात आणि नंतर इतर शाळेच्या वर्गांमध्ये जाऊन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे मंगळवारी दसरा आहे. या दसऱ्यानिमित्त आपट्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात पाने तोडली जातात. पानांसोबत फांद्याही तुटतात, त्यामुळे वर्षभर वाढ झालेल्या झाडाची तोडच होते. ही तोड थांबवून ज्या आपट्याच्या पानांना आपण सोनं समजतो ते खरोखरच सोनं आहे, त्यामुळे त्याची अशी विल्हेवाट न लावता ते आहे तसेच निसर्गाच्या सानिध्यात जपून ठेवावे. सण साजरा करण्यासाठी सोनेरी कागदाची फुले वापरावीत किंवा नैसर्गिक फुले वापरावीत, असा संदेश देण्याचाही या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - जालन्यात ५ मतदारसंघातून ५४ जणांची माघार, ७९ उमेदवार रिंगणात

तसेच आधी केले मग सांगितले अशा पद्धतीने हे विद्यार्थी स्वतःपासून या उपक्रमाला सुरुवात करणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी इंगळे, वेदिका पाटील, राजबाला झोलगिकर, ऋतुजा सोळुंके, समृद्धी जटाळे आदि विद्यार्थिनींचा समावेश आहे.

हेही वाचा - भोकरदन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने

ABOUT THE AUTHOR

...view details