बदनापूर (जालना) -कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व स्वच्छता कर्मचारी करत आहेत. त्यांच्या कार्याला एका विद्यार्थ्याने रांगोळी रेखाटून सलाम केला आहे.
महेश नवमीचे निमित्त साधून व सध्या सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये बदनापूर येथील ऋषिकेश जगदीश झंवर या 16 वर्षीय विद्यार्थ्याने रांगोळी रेखाटून आपल्या भावना व्यक्त केल्या. रांगोळीद्वारे त्याने सद्य परिस्थितीत पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन व स्वच्छता कर्मचारी कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून घेत असलेल्या परिश्रमाबाबत आभार व्यक्त केले आहेत. या रांगोळीच्या शेवटी त्याने लिहिलेली छोटीशी कविताही लिहिली आहे -
महादु नाही महादेव आहे तो।
देवघरात नाही दारोदार आहे तो।