जालना :सुट्टी असल्याने खरपुडी येथे फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास सेल्फी काढणे महागात पडले आहे. सेल्फी काढतांना तोल जाऊन त्याचा मोबाईल पाण्यात पडला. मोबाईल काढण्याच्या प्रयत्नात त्याचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे. अर्णव कैलाश गिरी(वय 15) असे त्याचे नाव (student Died While Taking Selfie in Jalna) आहे.
student Died While Taking Selfie : सेल्फी काढणे बेतले जिवावर ; विद्यार्थ्याचा खदानीत बुडून मृत्यु - अर्णव कैलाश गिरी
रविवारी सुट्टी असल्याने तीन मित्र व 2 मैत्रिणी असे पाच जण खरपुडी येथे फिरायला (student drowning while taking selfie) गेले. त्यात अर्णव कैलाश गिरी याचा मोबाईल सेल्फी काढताना पाण्यात पडला. मोबाईल घेण्यासाठी तो पाण्यात उतरला. पोहता येत नसल्याने त्याचा खदानीत बुडून मृत्यू झाला (student Died by drowning) आहे.
पाण्यात बुडून रेल्वे : गोलापांगरी येथील रहिवासी अर्णव कैलाश गिरी हा शिक्षण घेण्यासाठी जालना येथे मल्टीपर्पज शाळेजवळ भाड्याने रूम घेऊन राहत होता. काल रविवार(दि.11) रोजी सुट्टी असल्याने तीन मित्र व 2 मैत्रिणी असे पाच जण खरपुडी येथे फिरायला गेले. परिसरातील एका खदाणीजवळ सेल्फी काढत असताना त्याचा मोबाईल पाण्यात पडला. मोबाईल घेण्यासाठी तो पाण्यात उतरला. मात्र मोबाईल हाताला लागत नसल्याने आणखी खाली गेला. पोहता येत नसल्याने त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला (student drowning while taking selfie) आहे.
अग्निशमन दलास पाचारण : घटनेची माहिती कळतच खरपुडी येथील सरपंचांनी तालुका पोलीसांना माहिती (student Died by drowning) दिली. माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मजीद, संदीप बेरड, किशोर जाधव, अशोक राऊत, यांनी घटनास्थळ धाव घेऊन तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे, राहुल नरोडे, विठ्ठल कांबळे, जॉन गवळी, किशोर सकट, वाहन चालक विनायक चव्हाण यांनी परिश्रम घेतले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात (student Died by drowning while taking selfie) पाठविला.