महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना-औरंगाबाद सीमेवर चेकपोस्ट; वाहनांची कडक तपासणी - जालना-औरंगाबाद सीमा चेकपोस्ट बातमी

राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यापार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात सीमा असलेल्या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या आदेशाने चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत.

Jalna-Aurangabad checkpost
Jalna-Aurangabad checkpost

By

Published : Apr 23, 2021, 8:09 PM IST

जालना - शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बजावलेल्या आदेशानुसार जालना-औरंगाबाद जिल्ह्याची सीमा बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे चेक पोस्ट बनवून बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व ई-पास असणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जात आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शखाली वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.

जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट -

जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या आदेशाने चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसारच जालना-औरंगाबाद जिल्ह्याची सीमा असलेल्या वरुडी येथे बदनापूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी स्वतः वाहन तपासणी सुरू केली आहे.

चार पोलिसांचे पथक तैनात -

याठिकाणी चार पोलीस कर्मचारी तैनात आहेत. जालना जिल्हा हद्दीत ई-पास असेल किंवा अत्यावश्य सेवा असेल तरच प्रवेश दिला जात आहे. अन्यथा वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details