जालना -नवीन जालना भागात असलेल्या लोधी मोहल्ला येथे सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी ही जखमी झाले आहेत तर दरम्यान पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
राखीव पोलीस दलाची तुकडी दाखल -

दोन गटात झालेल्या या दगडफेकीनंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह चारही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि फौज फाटा घटनास्थळावर दाखल झाला होता. सोबत राखीव पोलीस दलाची एक तुकडीही बोलावण्यात आली होती.
पोलीस तळ ठोकून -
दरम्यान या दगडफेकीमध्ये दोन पोलीस जखमी झाले आहेत. आणि ज्या घरातून दगड आल्याचा संशय पोलिसांना होता. अशा घरांमधून 10 संशयितांना सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या भागात तणावाचे आणि भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी देखील सर्व तयारी निशी या भागात तळ ठोकला आहे.