महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगाव बंदोबस्ताला गेलेले एसआरपीएफचे जवान भोकरदन येथील शाळेत क्वारंटाईन - जालना कोरोना अपडेट

राज्य राखीव दलातील आणखी काही जवानांना मालेगाव येथे कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या जवानांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. या जवानांना जालना येथे आणण्यात आले. प्रथम त्यांची तपासणी करून 67 जवानांना जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तर 64 जणांना भोकरदन येथे पाठवण्यात आले.

Residential school
निवासी शाळा

By

Published : May 9, 2020, 9:07 AM IST

जालना -मालेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी गेलेले जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान परत आले आहेत. 130 जवानांपैकी 67 जवान जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तर उर्वरित जवान भोकरदन येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय निवासी शाळेत क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत.

भोकरदन येथील शासकीय निवासी शाळेत राज्य राखीव पोलीस दलाच्या 64 जवानांना ठेवण्यात आले

गुरुवारी या जवानांना जालना येथून एका वाहनात भोकरदन येथे आणण्यात आले. यात 61 जवान व 3 अधिकारी असे 64 जण असल्याची माहिती मिळत आहे. राज्य राखीव पोलीस दलातील मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या 4 जवानांना कोरोना झाल्याने जालन्यात खळबळ उडाली होती.

दरम्यान, राज्य राखीव दलातील आणखी काही जवानांना मालेगाव येथे कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या जवानांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. या जवानांना जालना येथे आणण्यात आले. प्रथम त्यांची तपासणी करून 67 जवानांना जालना येथे तर 64 जणांना भोकरदन येथे पाठवण्यात आले.

जवान दाखल झाल्यानंतर भोकरदन येथील अधिकारी गायब -

दरम्यान, भोकरदनच्या निवासी शाळेतील कोविड सेंटरमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे जवान येणार आहेत, म्हणून भोकरदन येथील सर्व जबाबदार अधिकारी चकरा मारत होते. तसेच त्यांची व्यवस्था करण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा उभी केली. हे जवान भोकरदन येथील सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र, एकही अधिकारी हजर नसल्याचे समजते. त्यामुळे जवान हे आपापल्या खोलीत थांबण्याऐवजी कोविड सेंटरच्या आवारात मनमोकळेपणाने फिरत असल्याचे चित्र आहे.

कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांची काळजी कोण घेणार?

समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय निवासी शाळा आणि मुला-मुलींच्या वसतिगृहात साफसफाई व सेक्युरिटीची कामे बीव्हीजी या खासगी कंपनी मार्फत केली जाते. याच ठिकाणी कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच याच कर्मचाऱ्यांना ही कामे करावी लागणार आहेत. आधीच तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी काम करतात. आता या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असताना अद्याप कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्यांना पुरवण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, या कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details