जालना - ग्राहकांनी 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी बँकेच्या आवारात मंडप घातला आहे. सध्या लॉकडाऊनदरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यामुळे बँकांचे व्यवहार नियमितपणे सुरू आहेत.
'स्टेट बँक ऑफ इंडिया'चा ग्राहकांसाठी 'मंडप' - jalna SBI Bank news
ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी बँकेच्या आवारात मंडप घातला आहे. त्यामुळे ग्राहकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. तसेच यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्यास मदत होत आहे.
'स्टेट बँक ऑफ इंडिया'चा ग्राहकांसाठी 'मंडप'
मात्र, बँकांमध्ये रांग लागल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करण्यात अनेक ठिकाणी अडचणी येतात. अशात सोशल डिस्टन्सचे पालन करताना या रांगा बँकेबाहेरदेखील जातात. यामुळे ऐन उन्हाळ्यात बँक ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी बँकेच्या वतीने मंडप घालण्यात आलाय. यामुळे ग्राहकांचे उन्हापासून संरक्षण होत असून सोशल डिस्टन्स राखण्यातही त्यांना मदत होत आहे.