महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी "स्पेशल मोदी रेल्वे" - रावसाहेब दानवे - उपमुख्यमंत्री अजित पवार

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेला आधीच 150 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार अजून रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकणात जाण्यासाठी केली जाणार आहेत. तसेच येणाऱ्या 7 सप्टेंबरला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे देखील दानवे यावेळी म्हणाले.

Special Modi Railway to go to Konkan for Ganeshotsav
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी रेल्वे - रावसाहेब दानवे

By

Published : Sep 4, 2021, 3:58 PM IST

Updated : Sep 4, 2021, 5:41 PM IST

जालना - गणेशोत्सावासाठी कोकणात जाणारी स्पेशल मोदी रेल्वे ही सोडण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते जालना येथे माध्यमांशी बोलत होते.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी रेल्वे - रावसाहेब दानवे

7 सप्टेंबरला स्पेशल मोदी रेल्वे -

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेला आधीच 150 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार अजून रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकणात जाण्यासाठी केली जाणार आहेत. तसेच येणाऱ्या 7 तारखेला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे देखील दानवे यावेळी म्हणाले.

संस्कृती टिकवण्यासाठी सण साजरे करणेही गरजेचे -

गणपती उत्सवाच्या काळात नागरिकांनी गर्दी टाळून कोरोनाच्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यावर बोलताना दानवे हे म्हणाले की, हे खरे आहे की कोरोना काळात सर्व नागरिकांनी नियम पाळले गरजेचे आहे. परंतु, आपली संस्कृती टिकवण्यासाठी सण साजरे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी काळजी घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. तसेच कोरोना काळात रेल्वे सोडायला आम्हाला अडचण नाही मात्र राज्य सरकारची सहमती त्यासाठी आवश्यक आहे, असेही दानवे यावेळी म्हणाले.

हेही वाचा -उद्यापासून विदर्भात पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज; वातावरणाचा पॅटन बदलाचे संकेत

Last Updated : Sep 4, 2021, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details