जालना - कोरोना विषाणूच्या संकटकाळात कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. सध्या खरीप हंगाम जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर बदनापूर तालुक्यात कृषी विभागाने सोयाबीन उगवण चाचणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सोयाबीनचे जवळपास 9 हजार 600 हेक्टर क्षेत्र आहे. यात 7 हजार 237 क्विंटल एवढे बियाणे लागणार आहे. शेतकऱ्यांनी बाजारातून विकत न घेता स्वतःकडे असलेले बियाणे वापरावे, असे आवाहन आमदार नारायण कुचे यांनी यावेळी केले.
जालना : बदनापूर तालुक्यात सोयाबीन उगवण चाचणीचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण - सोयाबीन उगवण चाचणी बातमी
बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथे शेतकऱ्यांना उपयुक्त व स्वस्तात गावातच बियाणे मिळावे या हेतूने सामूहिक स्वरुपात सोयाबीनची उगवण चाचणी घेतली गेली. यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शेतकरीही यात सहभागी झाले होते.
बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथे शेतकऱ्यांना गावातचउपयुक्त व स्वस्तात बियाणे मिळावे, या हेतूने सामूहिक स्वरूपात सोयाबीनची उगवण चाचणी घेतली गेली. तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के व मात्रेवाडी येथील भगवान मात्रे यांनी या उपक्रमाकरता पुढाकार घेतला. यावेळी कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शेतकरीही यात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना आमदार नारायण कुचे म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतःकडीलच सोयाबीन बियाणे वापरावे व बाजारात गर्दी करू नये. शासनाच्या वतीने बांधावर खते व बियाणे वाटपाचा कार्यक्रम सुद्धा कृषी विभाग घेत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी सोयाबीनची उगवण चाचणी कशी घ्यावी याची माहिती दिली व प्रयोग करून दाखवले. यावेळी हिवराळे, ठोसर, तनपुरे, घटे, भगवान मात्रे यांच्यासह सरपंच व शेतकरी उपस्थित होते.