महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यातील सोमठाणा प्रकल्प अद्यापही कोरडाच; १५ गावांमध्ये पाणीटंचाई

सोमठाणा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी पुरवले जाते. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात साचलेले पाणी पाटाद्वारे शेतीला सोडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून चरदेखील खोदण्यात आले आहे. मात्र, धरणातच पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी कसे द्यायचे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कोरडाठाक पडलेला जालन्यातील सोमठाणा प्रकल्प

By

Published : Jul 2, 2019, 10:08 PM IST

जालना - यंदाच्या पावसामुळे जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सर्व पाणीसाठे जवळपास पूर्ण भरण्याच्या स्थितीमध्ये आहे. मात्र, अत्यल्प पावसामुळे बदनापूर तालुक्यात असलेला अप्पर दुधना हा सोमठाणा प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. त्यामुळे १५ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरडाठाक पडलेला जालन्यातील सोमठाणा प्रकल्प

रेणुकादेवीच्या पायथ्याशी असलेला हा सोमठाणा प्रकल्प सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. गेल्या ३१ जानेवारी १९६५ ला तत्कालीन नगरविकास मंत्री डॉक्टर रफिक झकेरिया यांच्या हस्ते या तलावाचे उद्घाटन झाले होते. या तलावातून सोमठाणा गावासह १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, आतापर्यंत तालुक्यात १६८.५४ मिमी पाऊस अपेक्षित असताना फक्त ८५.८० टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे तलाव कोरडाठाक पडला आहे. परिणामी या परिसरातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

सोमठाणा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी पुरवले जाते. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात साचलेले पाणी पाटाद्वारे शेतीला सोडण्यासाठी पूर्वतयारी म्हणून चरदेखील खोदण्यात आले आहे. मात्र, धरणातच पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी कसे द्यायचे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

दरम्यान, अत्यल्प पावसामुळे तलावातील गाळामध्ये हिरवा चारा तयार झाला आहे. त्यामुळे जनावरे आणि शेळ्या-मेढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details