महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना युवा सेनेकडून 79 गावांना निर्जंतुकीकरणासाठीचे औषध

युवासेनेचे जालना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना, युवा सेना, कै. एकनाथराव घुगे प्रतिष्ठाण, ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, बदनापूर यांच्यावतीने बदनापूर तालुक्यातील 79 गावांत फवारणीसाठी सोडियम हाइपोक्लोराईट औषधाचे वितरण केले.

sodium-hypochlorite-for-disinfection-of-79-villages-from-shiv-sena-yuvasena
sodium-hypochlorite-for-disinfection-of-79-villages-from-shiv-sena-yuvasena

By

Published : May 6, 2020, 5:13 PM IST

बदनापूर (जालना) - कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात याची लागण होऊ नये, म्हणून शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून 79 गावांमध्ये फवारणी करण्याकरिता सोडियम हाइपोक्लोराईट औषधाचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

शिवसेना युवसेनेकडून 79 गावांना निर्जंतुकीकरणासाठीचे औषध...

हेही वाचा-COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय

युवासेनेचे जालना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना, युवा सेना, कै. एकनाथ घुगे प्रतिष्ठाण, ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, बदनापूर यांच्यावतीने बदनापूर तालुक्यातील 79 गावांत फवारणीसाठी सोडियम हाइपोक्लोराईट औषधाचे वितरण केले. बदनापूर येथील पंचायत समिती कार्यालयात सोशल डिस्टेन्सींगचे पालन करुन हे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, बदनापूर पंचायत समितीच्या सभापती शिंदे, उपसभापती रवी बोचरे, भरत मदन, अरुण डोळस, श्रीराम कान्हेरे, नंदकिशोर दाभाडे, गोरखनाथ लांबे, राजू जऱ्हाड, कैलास खैरे आदींची उपस्थिती होती.

शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात तालुक्यातील गरजुंना अन्नधान्य किट तसेच भाजीपाला किट वाटप करण्यात आल्या. लॉकडाऊन कालावधी वाढवला आहे. त्यामुळे नाम संघटनेच्या माध्यमातूनही अन्नधान्य, किराणा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर आता शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून तालुक्यातील 79 गावांत फवारणी करण्याकरिता सोडियम हाईपोक्लोराईट या औषधाच्या कॅनचे वाटप करण्यात येत आहे.

2000 लोकवस्तीपेक्षा कमी असलेल्या गावांसाठी पाच लिटरची कॅन तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात दोन कॅन देण्यात येणार असून ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंच यांनी आपल्या गावात ट्रॅक्टर किंवा ब्लोअरने याची फवारणी करायची आहे. ग्रामीण भागातील सरपंच व ग्रामसेवक यांनी गावात या कॅनमधील औषधांची फवारणी करताना एक लीटर पाण्यात 50 मिली औषध एकत्रित करून फवारणी करावी, तसेच प्रत्येक गावाने आपले गाव विषाणुमुक्त कसे राहील याची जबाबदारी घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. याच कार्यक्रमात शिवसेनेचे पंचायत समितीचे उपसभापती रवी बोचरे यांनी 11 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. 10 ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांना यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात या औषधाचे वाटप करण्यात आले असून इतर ग्रामपंचायतला ते गावात नेऊन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details