जालना - भोकरदन शहरात दिवाळीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीने "माणुसकीचा हाथ निराधारांना साथ" हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी दानशूरांकडून ऑनलाइन पद्धतीने पैसै स्वीकारण्यात आले. या उपक्रमामार्फत लहान मुलांना फराळाचे वाटप तसेच महिलांना साडी भेट देण्यात आली. छत्रपती सेनेचे विकास जाधव, गोकुळ सपकाळ आदी मान्यवरांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले. जालना रस्त्याजवळील पालावर राहणाऱ्या तसेच ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरीब कुटुंबांना हे साहित्य देण्यात आले. तसेच भोकरदन शहराजवळ गुप्तेश्वर जिनिंगमध्ये मध्य प्रदेशातील कामगारांना फराळ व महिलांना साड्या भेट देण्यात आल्या. यावेळी विकास जाधव, ईश्वर इंगळे, गोकुळ सपकाळ, गोकुळ सेठ राजपूत,विजय राजपूत, पंकज सपकाळ, अमोल सपकाळ, शिवराज सपकाळ, स्वप्नील जाधव, विश्वजित देशमुख आदी उपस्थित होते.
दिवाळीत गरिबांच्या तोंडावर उमटले हास्य... छत्रपती सेनेचा उपक्रम - माणुसकीचा हाथ निराधारांना साथ
भोकरदन शहरात दिवाळीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामार्फत गरीबांना मदत पुरवण्यात आली.
![दिवाळीत गरिबांच्या तोंडावर उमटले हास्य... छत्रपती सेनेचा उपक्रम social initiatives in jalna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9544518-942-9544518-1605354191951.jpg)
दिवाळीत गरिबांच्या तोंडावर उमटले हास्य... छत्रपती सेनेचा उपक्रम
दिवाळीत गरिबांच्या तोंडावर उमटले हास्य... छत्रपती सेनेचा उपक्रम
ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून मिळवली मदत
गोरगरीब, पालावर राहणाऱ्या कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून "माणुसकीचा हात निराधारांना साथ "हा उपक्रम राबवताना खूप आत्मिक सुख लाभले असून या उपक्रमाचे पूर्ण श्रेय हे ऑनलाइन फंडिंग करणाऱ्या दानशूरांचे आहे, असे विकास जाधव यांनी सांगितले. भोकरदन शहरात दिवाळीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.