जालना - जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंतही पीक विमा मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज पीक विमा मदतकेंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने सुरू केले पीक विमा मदतकेंद्र
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक ही ठाकरे यांनी नुकतीच मुंबईमध्ये घेतली. सर्व पीक विमा कंपन्यांची कार्यालये मुंबई येथेच असल्याने ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांची पूर्ण माहिती पुन्हा भरून घेण्यात येणार आहे. आणि मुंबईतील विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन संबंधित शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ९ जूनला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. चारा छावणीतील शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेच्या वतीने आणि शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला नसल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले होते.
यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक ही ठाकरे यांनी नुकतीच मुंबईमध्ये घेतली. सर्व पीक विमा कंपन्यांची कार्यालये मुंबई येथेच असल्याने ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांची पूर्ण माहिती पुन्हा भरून घेण्यात येणार आहे. आणि मुंबईतील विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन संबंधित शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.
दरम्यान, विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली तर शिवसेना त्यांना वठणीवर आणेल, असा इशाराही ही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. आज जुना जालना भागातील उड्डाणपुलाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्याहस्ते शेतकरी पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, दीपक रणनवरे, संतोष मोहिते, हरिहर शिंदे हे यांच्यासह महिला आघाडीच्या प्रमुख सविता किवनडे आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.