जालना - दिल्लीत महाराष्ट्र सदनात माझी आणि मुख्यमंत्र्यांची समोरा-समोर भेट झाली. आमच्या दोघांमध्ये नमस्कार सुद्धा झाला. नमस्कार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती. मग मी नमस्कार सुद्धा करायचा नाही का? पण माझ्या पक्षांतराच्या अफवा आहे. मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर ( Shiv Sena Deputy Leader Arjun Khotkar ) यांनी दिली आहे. गेला काही दिवसांपासून शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे.
Arjun Khotkar : माझा आणि मुख्यमंत्री शिंदेंचा नमस्कार झाला पण...; अर्जुन खोतकरांनी केले स्पष्ट - माझा आणि मुख्यमंत्री शिंदेंचा नमस्कार झाला
माझी आणि मुख्यमंत्र्यांची दिल्लीत भेट झाली. नमस्कार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती. मग मी नमस्कार सुद्धा करायचा नाही का? पण माझ्या पक्षांतराच्या अफवा आहे. मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर ( Shiv Sena Leader Arjun Khotkar ) यांनी दिली आहे.
Arjun Khotkar
सोशल मीडियात अर्जुन खोतकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या अफवा असून मी बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो आणि यापुढेही राहील, असेही खोतकर म्हणाले. मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार आहे. नमस्कार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती असून मुख्यमंत्री भेटल्यानंतर त्यांना नमस्कार सुद्धा करायचा नाही का? असा सवाल देखील खोतकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -MH gov Cabinet Expansion : दिल्लीत आज होणार शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची खलबत्ते?
Last Updated : Jul 22, 2022, 4:19 PM IST