जालना - जिल्हा शिवसेनेकडून लॉकडाऊनच्या काळात अन्नाची गरज असलेल्या गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. या वाटपाचा शुभारंभ आज गुरुवारी अर्जुन खोतकर यांच्या कार्यालयात झाला. शेष महाराज भागवत गोंदीकर यांच्या उपस्थितीत या किटचे वाटप सुरू झाले.
शिवसेनेकडून अन्नधान्याचे वाटप, अर्जुन खोतकर यांचा पुढाकार - news about Arjun Khotkar
शिवसेनेकडून जालना शहरात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. गहू, तूरडाळ, तांदूळ, गूळ, अशा प्रकारच्या जीवनावश्यक अन्नधान्य साहित्याचे वाटप यावेळी नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आले.
![शिवसेनेकडून अन्नधान्याचे वाटप, अर्जुन खोतकर यांचा पुढाकार shiv-sena-distributed-food-grains-in-jalna-city](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6910982-thumbnail-3x2-arjunk.jpg)
शिवसेनेच्या वतीने अन्नधान्याचे वाटप, अर्जुन खोतकर यांचा पुढाकार
शिवसेनेच्या वतीने अन्नधान्याचे वाटप, अर्जुन खोतकर यांचा पुढाकार
गहू, तूरडाळ, तांदूळ, गूळ, अशा प्रकारच्या जीवनावश्यक अन्नधान्य साहित्याचे वाटप यावेळी नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आले. नगरसेवकांच्या माध्यमातून त्या-त्या प्रभागातील हातावर काम असणाऱ्या आणि उपासमारीची वेळ आलेल्या गरजूंना या अन्नधान्याचे वाटप होणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, संजय खोतकर, अभिमन्यू खोतकर, पदाधिकारी विष्णू पाचफुले,पंडीतराव भुतेकर, माजी आमदार संतोष सांबरे आदींची उपस्थिती होती.