महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना मतदारसंघ : वंचित बहुजन आघाडीतर्फे शरदचंद्र वानखेडे मैदानात - wankhede

जालना जिल्ह्यावर राज्याचे लक्ष लागले आहे, मात्र या जिल्ह्यात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मैदानात उतरल्याचे वानखेडे यांनी सांगितले. शरदचंद्र वानखेडे सर्वात उच्चशिक्षित उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना कितपत यश मिळेल हे येणारा काळच ठरवेल.

डॉ. शरदचंद्र वानखेडे

By

Published : Mar 16, 2019, 4:48 PM IST

जालना - भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

शरदचंद्र वानखेडे यावेळी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. २०१४ मध्ये बहुजन समाज पक्षातर्फे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. ते या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांची मुख्य लढत असणार आहे. २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा मराठवाड्यात झाली, त्यानंतर वंचित आघाडीच्या अनेक सभा मराठवाड्यात पार पडल्या. एक वेगळ्या वातावरणाची निर्मिती करण्याचा प्रयत्न भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांनी केला.

जालना जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेल्या २० वर्षांपासून खासदार आहेत. जालना जिल्ह्याचा कुठलाही विकास त्यांनी केलेला नाही, त्यामुळे बहुजन वंचित आघाडीला चांगला जनाधार मिळेल, असा विश्वास डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी व्यक्त केला. अर्जुन खोतकर हे कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार नाहीत रावसाहेब दानवे असो, की अर्जुन खोतकर दोघेही जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला. वंचित बहुजन आघाडीत अठरापगड समाजाचे लोक जोडले जात आहेत. त्यामुळे यावेळी बहुजन आघाडीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details