महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही पैलवानांसोबत कुस्त्या खेळतो; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर - Maharashtra Assembly Elections 2019

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी आखाड्यात पैलवानाच नाहीत, असे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कोणासोबत कुस्त्या खेळायच्या आणि कोणासोबत नाही हे आम्ही ठरवतो.

घनसावंगीच्या सभेत बोलताना शरद पवार

By

Published : Oct 14, 2019, 12:02 AM IST

जालना - आखाड्यात पैलवानच नाहीत असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, ते विसरले आहेत मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्ही पैलवाना सोबतच कुस्त्या खेळतो यांच्यासोबत नाही, असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर


घनसावंगी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा पवारांनी उपस्थित केला. माझ्या काळात मी शेतकऱ्यांना आत्महत्या करू दिल्या नाहीत. मात्र, हे सरकार शेतकरीविरोधी आहे. कांद्याला भाव देखील मिळू देत नाही. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, त्यामुळे या सरकारला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही, अशी टीका पवारांनी केली.

हेही वाचा - मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल'


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी आखाड्यात पैलवानाच नाहीत, असे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कोणासोबत कुस्त्या खेळायच्या आणि कोणासोबत नाही हे आम्ही ठरवतो. पर्यायाने आम्ही कुस्त्या पैलवान सोबत ठेवतो,(विशिष्ट प्रकारचे हातवारे करत) यांच्या सोबत नाही.

आपण फुल टाईम काम करत असून लोक पार्टटाईम काम करतात. पाच दिवस मुंबईमध्ये बिल्डरचा व्यवसाय आणि दोन दिवस घनसावंगीत अशा प्रकारचा यांचा कार्यक्रम सुरू आहे. टोपे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. विरोधकांनी मुंबईतील व्यवसायतदेखील अनेक घोटाळे केले आहेत. त्यामुळे अशा घोटाळेबाज उमेदवाराला निवडून द्यायचे का? हे जनतेने ठरवावे, असे राजेश टोपे यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details