महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात थकीत वेतनासाठी समाज कल्याण कार्यालयासमोर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे उपोषण - सुरक्षा कर्मचाऱ्यांचे उपोषण

थकीत वेतन, पगार वाढ मिळण्यासाठी सुरक्षा रक्षक उपोषणाला बसले आहेत. सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालय जालना येथे हे सुरक्षा रक्षक उपोषण करत आहेत. या कर्मचाऱ्यांना मे महिन्यापासून पगारच दिला गेला नाही.

जालन्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे उपोषण
जालन्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे उपोषण

By

Published : Dec 1, 2020, 7:39 PM IST

Updated : Dec 2, 2020, 7:17 AM IST

जालना - खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या पुणे येथील क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे समाजकल्याण आयुक्तालयाकडे सुमारे शंभर कोटीचे देयक थकले आहे. त्यामुळे या कंपनीला निधी उपलब्ध न झाल्याने या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले. सुरक्षा रक्षकांनी आजपासून समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

जालन्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे उपोषण

जिल्ह्यातील 36 कर्मचाऱ्यांचा आहे समावेश

समाजकल्याण आयुक्तालयामार्फत जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध निवासी शाळेमध्ये खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या कंपनीचे जालना जिल्ह्यातील बदनापुर, जालना, अंबड आदी ठिकाणी 36 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना मे महिन्यापासून पगारच दिला गेला नाही. त्यामुळे थकीत वेतन, पगार वाढ मिळण्यासाठी हे कर्मचारी आजपासून सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालय जालना येथे महिला कर्मचाऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत.

100 कोटींची थकबाकी-

जालना जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्रातील जिथे-जिथे या कंपनीने सुरक्षारक्षक पुरविले आहेत. त्या सर्वच ठिकाणचे वेतन थकले आहे. समाज कल्याण विभागाने मे 2019पासून एकही बिल काढलेले नाही. तरीदेखील कंपनीने एप्रिलपर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले आहे. मात्र आता कंपनीकडे निधी उपलब्ध नसल्याने कंपनीने समाज कल्याण विभागाकडे वारंवार निधी मागितला आहे. सुमारे शंभर कोटींचा निधी थकला आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, अशी माहिती या कंपनीचे औरंगाबाद विभागाचे सहायक व्यवस्थापक ईश्वर चंदनशिव यांनी दिली आहे.

मराठवाड्यात 133 कर्मचारी-

क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, या कंपनीचे मराठवाड्यात 133 कर्मचारी आणि पाच अधिकारी आहेत. त्यापैकी 36 कर्मचारी हे जालना जिल्ह्यातील विविध शासकीय वस्तीगृह, निवासी शाळा, सामाजिक न्याय भवन येथे कार्यरत आहेत. आज या उपोषणामध्ये श्रीमंत नागरे, गणेश लोखंडे, कमलाकर घोरपडे, बाळू पवार,अर्जुन कावळे, शिवाजी पवार, यांच्यासह महिला कर्मचारी सविता पराये, तारा डोंगरे, पुष्पा ससाने, यमुना बांगर आदी महिलांचाही समावेश आहे.

हेही वाचा-लंका प्रीमियर लीगमध्ये युवा खेळाडूवर संतापला आफ्रिदी, म्हणाला...

हेही वाचा-मतदार यादीतून उमेदवार अभिजित बिचुकलेंचे नाव गायब

Last Updated : Dec 2, 2020, 7:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details