महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुसऱ्या दिवशीही दारूच्या दुकानांसमोर तोबा गर्दी; विक्रेत्यांसाठी 'असे' झाले डाटा कलेक्शन सेंटर - ऑनलाईन बुकींग

शनिवारी ऑनलाईन मागणी केल्यानंतरही अनेक मद्यप्रेमींना दारू न मिळाल्यामुळे त्यांनी आज थेट ही दुकाने गाठत तक्रारी केल्या. मात्र, मागणी जास्त असल्यामुळे आणि पुरवठा करण्यासाठी कामगार कमी असल्यामुळे हा पुरवठा होऊ शकला नाही.

Daru
दारू दुकानांसमोर झालेली गर्दी

By

Published : May 17, 2020, 1:40 PM IST

जालना- ऑनलाईन दारू विक्रीचा आज दुसरा दिवस आहे. शनिवारी ऑनलाईन मागणी केल्यानंतरही अनेक मद्यप्रेमींना दारू न मिळाल्यामुळे त्यांनी आज थेट ही दुकाने गाठत तक्रारी केल्या. मात्र मागणी जास्त असल्यामुळे आणि पुरवठा करण्यासाठी कामगार कमी असल्यामुळे हा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे अनेक मद्यप्रेमींना दारूपासून वंचित रहावे लागले.

दुसऱ्या दिवशीही दारूच्या दुकानांसमोर तोबा गर्दी; विक्रेत्यांसाठी 'असे' झाले डाटा कलेक्शन सेंटर

ऑनलाईन बुकींगमुळे जालना शहराच्या दुसऱ्या कोपरापासूनही अनेकांनी पद्धतीने बुकिंग केली आहे. मात्र प्रत्यक्षात चार-पाचशे रुपयाच्या दारूसाठी जालना शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. ही देखील एक मोठी अडचण आहे. या दारू दुकानावर गर्दी झाल्यामुळे सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली होती. आज ते दुकान बंद आहे. मात्र अन्य तीन दुकानांवर मद्यप्रेमींची गर्दी आहे.

डाटा कलेक्शन मोठ्या प्रमाणात

दारू पिण्यासाठी परवाना लागतो हे बहुतांशी लोकांना माहीतच नाही. त्यामुळे आत्तापर्यंत कुठेही, कधीही, केव्हाही, दारू पिणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. बार बंद असल्यामुळे घरी बसून पिण्यासाठी परवाना काढावा लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन परवाने काढल्या जात आहेत. या माध्यमातून दारू विक्रेत्यांकडे मोठे डाटा कलेक्शन होत आहे. हे डाटा कलेक्शन त्यांना वर्षभरासाठी ताळमेळ घालण्यासाठी सोपे जाणारे आहे. कारण दुकानातून विक्री झालेल्या दारूचा ताळेबंद देताना दारू कोणाला दिली, किती दिली, परवाना होता, का या सर्व बाबी राज्य उत्पादन शुल्क विचारतात आणि दुकानदार ज्यांच्या नावावर परवाने आहेत, अशांच्या नावावर ही दारुविक्री दाखवतो.

यामध्ये बहुतांश वेळा ज्यांनी कधीही दारू घेतली नाही, मात्र परवाना काढलेला आहे, अशा परवानाधारकांच्या नावावर देखील बिल पाडले जाते. या दारु विक्रेत्यांकडे परवाना क्रमांक गेला तिथे कायम बिल पडत राहतात एवढेच नव्हे, तर बाहेरगावचे मद्यपी जालन्यात येऊन घेऊन गेले, असे म्हणत त्यांच्या नावावर देखील ही दारूविक्री दाखविली जाते आणि ताळमेळ घातला जातो. त्यामुळे कालपासून ऑनलाईनद्वारे निघालेले परवाने हे या दारू विक्रेत्यांसाठी मोठे डाटा कलेक्शन सेंटर झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details