जालना- निरसर्गाने मानवाला दिलेल्या हवा, पाणी आणि वृक्ष यांची जपणूक व संवर्धन न केल्यास मनुष्याच्या जीवनाचा धिंगाणा होईल, असा संदेश वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात ५ लाख वृक्ष लागवडीच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
निसर्गाने दिलेल्या गोष्टींची जपणूक न केल्यास जीवनाचा धिंगाणा होईल
हवा, पाणी आणि वृक्ष यांची जपणूक व संवर्धन न केल्यास मानुष्याच्या जीवनाचा धिंगाणा होईल, असा संदेश वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिला.
शासनाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या क्षेत्रामध्ये वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवितेच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर महाडिक यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. महाडीक यांनी सोप्या सरळ आणि सुटसुटीत भाषेत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवाडीचा संदेश दिल्याने विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर पावसाच्या रिमझिम सरींमध्ये विद्यार्थ्यांनी परिसरात वृक्ष लागवड केली. त्यानंतर कन्हैया नगर परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्राच्या जागेपासून शहरातील सी. टी .एम .के शाळेपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करून एक वेगळेच वातावरण निर्माण केले.