महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरपंचाच्या पुढाकाराने दैठणा येथील 2 हजार गरजूंना मोफत स्वस्त धान्य वाटप - jalna news

माझे गाव हे माझे कुटुंब असल्याचे मी मानतो, संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे हा माणुसकी धर्म आहे, तोच माणुसकी धर्म आपण जपत असल्याचे सरपंच शत्रुघ्न कणसे सांगतात. मागील महिन्यात गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १ किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले होते.

सरपंचाच्या पुढाकाराने दैठणा येथील 2 हजार गरजूंना मोफत स्वस्त धान्य वाटप
सरपंचाच्या पुढाकाराने दैठणा येथील 2 हजार गरजूंना मोफत स्वस्त धान्य वाटप

By

Published : May 7, 2020, 6:17 PM IST

जालना -दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अनेक शेतमजूर, गोरगरीब कुटुंबाच्या हाताला रोजगार नाही. जवळ असली नसली जमापुंजी महिनाभर पुरली, आता पुढे काय? असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतमजूर जनतेला पडला आहे.

शासनाकडून स्वस्त दरात मिळणारे रेशन या कुटुंबांसाठी मोठा आधार आहे. मात्र, हे स्वस्त दरातील रेशन विकत घेण्यासाठी सुद्धा पैसा शिल्लक नाही. अशा स्थितीत लोकांची अडचण ओळखून संकटात लोकांच्या मदतीला धावून जात परतूर तालुक्यातील दैठणा बुद्रुक येथील सरपंच शत्रुघ्न कणसे यांनी गावातील सर्व रेशन कार्डधारकांचे पैसे स्वतःच्या खिशातून भरून गावकऱ्यांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये गहू, तांदूळ आणि साखर या सामानाचा समावेश आहे. गावातील २००० लोकांना याचा लाभ झाला आहे.

सरपंचाच्या पुढाकाराने दैठणा येथील 2 हजार गरजूंना मोफत स्वस्त धान्य वाटप

"माझे गाव हे माझे कुटुंब असल्याचे मी मानतो, संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे हा माणुसकी धर्म आहे, तोच माणुसकी धर्म आपण जपत असल्याचे सरपंच शत्रुघ्न कणसे सांगतात. मागील महिन्यात गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १ किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, किराणा दुकानदार, गिरणी चालक आणि पत्रकार यांना तीन एकरातील मोसंबीचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम दैठणा बु. येथील सरपंच शत्रुघ्न कणसे यांनी हाती घेतला आहे. सोबतच तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांना १५०० मास्क, सॅनीटायजरचे वाटपदेखील करण्यात आले आहे.

मोफत शुद्ध पाणी पुरवठा -

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी वैयक्तिक स्वच्छता तसेच सामाजिक स्वच्छतेचे आचरण महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी अशुद्ध असेल तर त्या माध्यमातून अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही गरज ओळखून दैठणा बु. ग्रामपंचायतच्या वतीने सुरुवातीला सशुल्क पाणी जार दिले होते. लॉकडाऊनमध्ये लोकांची अडचण ओळखून पाणी जार मोफत वाटप करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याचा मोठा फायदा गावकऱ्यांना झाला आहे. हे धान्य वाटप करतेवेळी सरपंच शञुघ्न कनसे, वसंतराव बेरगुडे,राधेगोविंद रेपे, शामराव चव्हाण, दत्ताञय बेरगुडे, आसाराम उनवने, सदाशिव राकुसले, परमेश्वर रेपे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details