जालना - 'सारी'ही एक श्वसनाचा आजार आहे. कोरोना संसर्गासारखीच सारी आजाराची लक्षणे आहेत. श्वसन संस्थेला बाधा पोहोचणे अशा प्रकारचा हा आजार आहे. मात्र, 'सारी'पासून माणसाला कोरोनाएवढा धोका नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली. ज्या माणसांना दम्याचा, अस्थमाचा त्रास आहे, अशा लोकांमध्ये ही लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांना देखील असे रुग्ण आढळल्यानंतर सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात 'सारी'चा कोरोना एवढा धोका नाही मात्र, नागरिकांनी घ्यावी दक्षता - sari
कोरोनाच्या संभाव्य रुग्णाप्रमाणेच सारीची लक्षणे आहेत अशा रुग्णांचेदेखील स्वॅब घेत असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सारीची लक्षणे दिसतील. मात्र, सारी असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असतीलच असे नाही, असेही ते म्हणाले.
राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले असतानाच आता सारी या आजाराचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संभाव्य रुग्णाप्रमाणेच सारीची लक्षणे आहेत अशा रुग्णांचेदेखील स्वॅब घेत असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सारीची लक्षणे दिसतील. मात्र, सारी असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असतीलच असे नाही, असेही ते म्हणाले.
सारीमुळे जनतेने घाबरून जाऊ नये कारण, हा आजार कोरोना एवढा भयानक नाही. मात्र, दम्याचा जास्त त्रास होईल अशा व्यक्तींनी सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असेही ते यावेळी म्हणाले.