महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. आंबेडकरांना अपेक्षित राष्ट्रनिर्मिती झाली नाही - प्रा. संभाजी पाटील - Bababsaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जालना येथे सुरू असलेल्या ४२ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत संभाजी पाटील  शनिवारी बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना संभाजी पाटील

By

Published : Apr 14, 2019, 10:24 AM IST

जालना - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली राष्ट्रनिर्मिती झाली नाही, असे मत प्राध्यापक संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जालना येथे सुरू असलेल्या ४२ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते शनिवारी बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना संभाजी पाटील

'राष्ट्रनिर्माते बाबासाहेब समजून घेताना' या विषयावर बोलताना प्राध्यापक पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली राष्ट्रनिर्मिती अजून झालेली नाही. कारण त्यांनी सांगितल्यानुसार 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' यापैकी आपण शिकलो. मात्र, संघटित झालो नाहीत. संघटित न झाल्यामुळे आंबेडकरांना अभिप्रेत असलेली राष्ट्रनिर्मिती होऊ शकली नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

त्याचसोबत परिवर्तनाचे बीज हे विचारात असते. त्यामुळे विचारांचा जागर आणि देवाण-घेवाण झाली पाहिजे, असे मतही प्राध्यापक पाटील यांनी व्यक्त केले. सध्या परिस्थिती चार घटकच राष्ट्र चालवीत आहेत ते म्हणजे सेठजी, भटजी, लाटजी आणि बाटजी. सेठजी म्हणजे व्यापारी, भटजी म्हणजे पौरोहित्य करणारे, लाटजी म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आणि बाटजी म्हणजे वरून आंबेडकरांना मानणारी त्यांचा उदोउदो करणारी, मात्र आतून या समाजाला कधीही जवळ न येऊ देणारी व्यवस्था. या चार घटकांवरच सध्या राजकीय परिस्थिती अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्याख्यानमालेच्या समारोपाच्या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे, या व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे, संजय खोतकर, सुनील साळवे, ऍड. बी. एम. साळवे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details