जालना- महिला अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेले गुण आणि स्वाभिमान जागा करण्यासाठी शासनाच्या वतीने यावर्षीपासून सखी मतदान केंद्र ही नवीन संकल्पना अंमलात आणली आहे .या माध्यमातून मतदान केंद्र हे पूर्णपणे महिलांच्या ताब्यात असते. या माध्यमातून मतदान केंद्रप्रमुख आणि त्यांच्या सहकारी यांना अडचणीच्या वेळेस निर्णय घेण्याची क्षमता दाखवता येते.
जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण दहा सखी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये जालन्यात एक, बदनापूर एक, भोकरदन २, सिल्लोड २ ,फुलंब्री २ आणि पैठण २. त्यापैकी जालना शहरात असलेल्या सेंट मेरी हायस्कूलच्या ५५ क्रमांकांच्या मतदान केंद्रावर हे "सखी मतदान केंद्र" सुरू आहे. या केंद्राच्या मतदान अधिकारी म्हणून सुहासिनी देशमुख या पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहेत. त्याचसोबत देवयानी भारसवाडकर देखील त्यांना व्यवस्थापन पाहण्यात मदत करीत आहेत. उर्वरित महिला कर्मचाऱ्यांमध्ये सुप्रिया हजारे, अशा नलावडे, संध्या पवार, अनुपमा दाभाडे, या महिलांचा समावेश आहे.