महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदन तालुक्यातील १६ गावात १६२ गरीब कुटुंबांना सॅक्रेड संस्थेचा मदतीचा हात - कोरोना

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्यामुळे हाताला काम नाही व काम नाही म्हणून पैसा नाही यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे संस्थेनी १६ गावातील १६२ कुटुंबाला धान्य कीट देवून मदतीचा हात दिला.

sacred helps one hundred sixty two family in bhokardan
भोकरदन तालुक्यातील १६ गावात १६२ गरीब कुटुंबांना सॅक्रेड संस्थेचा मदतीचा हात

By

Published : Apr 27, 2020, 10:36 AM IST

Updated : Apr 27, 2020, 10:46 AM IST

भोकरदन(जालना)-कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने हातावर पोट असणारी कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. भोकरदन तालुक्यातील 16 गावातील 162 कुटुंबांच्या मदतीसाठी सॅक्रेड संस्था उभी राहिली आहे. संस्थेने 162 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.

भोकरदन तालुक्यातील १६ गावात १६२ गरीब कुटुंबांना सॅक्रेड संस्थेचा मदतीचा हात

भोकरदनमधील रजाळा, टाकळी, सिरसगांव मंडप. गोशेगाव,खडकी, चिंचोली, तपोवन, नळणी, खापरखेडा, तडेगाव, भिवपुर, कुंभारी, चांदई, कोठार जैन, पिंपळगाव बारव,बाणेगाव या गावातील अत्यंत गरीब कुटुंबांना रविवारी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

राशन मिळत नाही.घरात कर्ता व्यक्ती नाही अशा कुटुंबांची माहिती घेऊन सॅक्रेड संस्थेच्या वतीने धान्य कीट वाटप करण्यात आले. कीटमध्ये तेल, साखर, डाळ,कडधान्य यांचा समावेश आहे. कोरोना पासून वाचायचे असेल तर घरा बाहेरपडू नका, असा संदेश संस्थेच्या वतीने गावातील नागरिकांना तालुका समन्वयक सुनील ससाणे यांनी दिला.

गावपातळीवर धान्य कीट वाटप करण्यासाठी तालुका समन्वयक सुनिल ससाणे, क्षेत्रसंवादक अनिल जाधव,रामेश्वर राउत तसेच गावातील बालमित्र, अंगणवाडी सेविका, गाव बाल संरक्षण समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Last Updated : Apr 27, 2020, 10:46 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details