महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

गेल्या वर्षभरापासून जालना शहरामध्ये विविध ठिकाणी मंगळसूत्र चोरी, जबरी घरफोड्या अशा गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जालन्यात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

By

Published : Sep 23, 2019, 11:53 PM IST

जालना -शहरांमध्ये विविध ठिकाणी घरफोड्या करणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जबरी घरफोड्या, मंगळसूत्र अशा प्रकरणातील 5 लाख 93 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जालन्यात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

हे ही वाचा - मुंबईत दुकानांमध्ये चोरी करणारी लड्डू गँग जेरबंद

गेल्या वर्षभरापासून जालना शहरामध्ये विविध ठिकाणी मंगळसूत्र चोरी, जबरी घरफोड्या अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या गुन्ह्यातील चोरांचा तपास लागत नव्हता. यासंदर्भात तपास घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आकाश उर्फ चोख्या राजू शिंदे (रा. नूतन वसाहत), सचिन बाबू गायकवाड (रा.कैकाडी मोहल्ला) आणि राम सखाराम निकाळजे (रा. देऊळगाव राजा) हे कैकाडी मोहल्ला परिसरात थांबले आहे. त्यांनी शहरातील विविध ठिकाणी घरफोडी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना केल्या आहेत. या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कैकाडी मोहल्ला येथे जाऊन पाच-सहा दिवसापूर्वी या तिघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा - धुळ्यात माजी सरपंचाला महिलांची बेदम मारहाण

या दरम्यान या आरोपींनी बजरंग दाल मिल, ब्राह्मण गल्ली, पिवळा बंगला, भाग्यनगर कांचन नगर, प्रकाश ट्रान्सपोर्ट आदी ठिकाणी घरफोड्या आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली. आठ ठिकाणी मंगळसूत्र चोरी केल्याचेही त्यांनी कबूल केले. या प्रकरणात चोरी गेलेला 30 ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर घरफोडीतील 110 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 140 ग्रॅम सोन्याचे दागिने, 25000 रूपये आणि गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी असा एकूण 5 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस शिपाई सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाढ, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, विलास चेके, रवी जाधव यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा - अकोल्यात गावगुंडाच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत, गावकऱ्यांचा मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details