जालना - शहरातील मृद आणि जलसंधारण सेवानिवृत्त अनुरेखक गोविंद केदार या कर्मचाऱ्याने कार्यालयाच्या परिसरात एक हजार वृक्ष लागवड करून ती जोपासली आहेत. स्वखर्चातून त्याची मशागत करत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही या वृक्षाची पाहणी केली असून, केदार यांचे कौतुक केले आहे.
भोकरदनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून १ हजार वृक्षांची स्वखर्चातून मशागत - अनुरेखक गोविंद केदार
जालना शहरातील मृद आणि जलसंधारण सेवानिवृत्त अनुरेखक गोविंद केदार या कर्मचाऱ्याने कार्यालयाच्या परिसरात एक हजार वृक्ष लागवड करून ती जोपासली आहेत. स्वखर्चातून त्याची मशागत करत आहे.
विविध कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नियमित येत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. याला अपवाद केदार राहिले आहेत. ते सेवानिवृत्त झाले असले तरी ते कार्यालयात येतात. त्यांनी उपअभियंता रमेश जाधव यांच्यासमोर कार्यालयाच्या परिसरात वृक्षाची लागवड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तुम्ही फक्त वृक्षांची रोपे आणून द्या, त्याचे संगोपन करण्याची माझी जबाबदारी असल्याचे सांगितले. यावर जाधव यांच्यासह कार्यालयातील अंबादास सहाणे, वैशाली कायस्थ, जावेद शेख यांनी लिंब, पिंपळ, बांबू, कवठ, सीताफळ, करंज, उंबर, गुलमोहर, सुबाभूळ आदी विविध जातीचे १ हजार वृक्षाची जून २०१९मध्ये लागवड केली.
गत वर्षी चांगला पाऊस झाल्याने वृक्ष लागवड १०० टक्के जगली. या झाडाची अंतर मशागत व त्याला पाणी टाकून त्यांचे संगोपन करण्याचे काम जी. जी. केदार करीत आहेत. उपअभियंता आर. के. जाध म्हणाले, २०१९मध्ये केदार हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवेचा बहुतांश कालावधी हा भोकरदन येथील कार्यालयात गेला आहे. त्यांनी वृक्ष लागवड करण्याची योजना आमच्या समोर मांडली आम्ही सर्वांनी होकार दिला. विविध जातीचे वृक्ष लागवड केले. याला ११ महिने झाले आहेत. आज ते सर्व झाडे जगली असून डौलदार दिसत आहेत.