बदनापूर (जालना) -तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. सोडत पद्धतीने हे आरक्षण जाहीर करण्यात आले. या सर्व ग्रामपंचायतींची मुदत संपली होती.
बदनापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने निर्देश देऊन निवडणूक कार्यक्रम व आरक्षण जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी तहसीलदार छाया पवार, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, नायब तहसीलदार शेख फारूकी यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.