महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' तरुणांचे मृतदेह 21 तासानंतर विहिरीबाहेर काढण्यास यश - बदनापूर तालुका बातमी

शनिवारी (दि. 21 नोव्हेंबर) विहिरीतील पाणी शेताला सोडताना शॉक लागून दोन तरुण विहिरीत पडले होते. त्यांचा शोध कालपासून सुरू होता. मात्र, त्यांचे मृतदेह आज 11 वाजेपर्यंत मिळाले आहे.

मृत तरुण
मृत तरुण

By

Published : Nov 22, 2020, 3:55 PM IST

बदनापूर (जालना) -तालुक्यातील कुसळी येथे माळेगाव शिवारातील शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले दोन तरुण 21 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता विजेचा शॉक लागून विहिरीत पडले होते. त्यांचा शोध सुरू असतांना तब्बल 21 तासानंतर दोन्ही तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील दत्तू वैद्य यांच्या माळेगाव शिवारातील शेतात शनिवारी (दि. 21 नोव्हेंबर) मोटार सुरू करून शेताला पाणी सोडण्यासाठी प्रदीप कैलास वैद्य (वय 18 वर्षे, रा. कुसळी) व गणेश कृष्णा तारडे (वय 18 वर्षे, अंबड) हे दोघे आते-मामे भाऊ दुपारी 2 वाजेच्या सुमारास विहिरीकडे गेले हेाते. विशेष म्हणजे गणेश कृष्णा तारडे हा तरुण दिवाळीनिमित्त मामाच्या गावाला आलेला होता. तो व प्रदीप दोघे समवयस्क असल्यामुळे दोघेही शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीकडे गेले होते तेव्हा विजेचा शॉक लागून दोघे विहिरीत पडले असता अग्निशामक दल व पानबुडी कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र, मिळून न आल्याने रात्री शोध घेणे थांबविण्यात आले होते. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता सकाळी 10 वाजून 7 मिनिटाला प्रदीप वैद्य या तरुणाचा मृतदेह गळाला लागून वर काढला तर 11 वाजता गणेशचा मृतदेह काढण्यात आला. तब्बल 21 तासांनंतर दोन्ही तरुणाचे मृतदेह सापडले असून पुढील कारवाई सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details