जालनाऔरंगाबाद घाटी रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या बालकाला न्युमोनिया आजार झाल्याने त्याच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, जालना जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने जालना जिल्हा रुग्णालय रेफर करण्यात आले. त्यानंतर बालकाला आणले असता, 24 तास मॉनिटंरिंग करण्यासाठी डॉक्टर नसल्याचे कारण देत बालकाला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला.
दोन महिन्यांच्या बाळाला रूग्णालयात दाखल करून घेण्यास नकार, डॉक्टर नसल्याचे कारण देत दिला नकार - जालना जिल्हा रुग्णालय
जालन्यात दोन महिन्यांच्या बालकाला रूग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दवाखान्यात डॉक्टर नसल्याचे कारण देत दिला नकार. दोन तासांपासुन नवजात बालक ऑक्सिजनविना रूग्णवाहिकेत पडून होते.
दोन महिन्यांच्या बाळाला रूग्णालयात दाखल करून घेण्यास नकार, डॉक्टर नसल्याचे कारण देत दिला नकार
रुग्णालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असताना देखील नातेवाईकांना दोन तासापासून नवजात बालक ऑक्सिजनवर रुग्णवाहिकेत घेऊन बसण्याची वेळ आली. विनवण्या करून ही कुणीच दखल घेत नसल्याने अखेर नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांच्या सल्ल्याने या बालकाला दोन तासानंतर खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जालना जिल्हा रुग्णालयाचा बेजबदार पण समोर आला आहे.