महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीच्या पंचनाम्याचे चावडी वाचन करा - रावसाहेब दानवे - Ravsaheb Danve latest news jalna

जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात असलेल्या कापूस, मका बाजरीच्या शेतीची खासदार दानवे यांनी पाहणी केली. यावेळी शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना रावते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

रावसाहेब दानवे

By

Published : Nov 5, 2019, 8:54 PM IST

जालना - राज्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषकरुन मराठवाड्यात जास्त नुकसान झाले आहे. त्याच सोबत शासनाने जागोजागी बांधलेले कोल्हापुरी बंधारे फुटल्यामुळे शेतीसाठी साठवून ठेवलेले पाणीदेखील वाहून गेले आहे. हे पाणी शेतात आल्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. आज आपणही दुष्काळाची पाहणी करुन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याची चावडी वाचन करावे, असे आवाहन खासदार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

रावसाहेब दानवे

हेही वाचा-...अन्यथा 11 नोव्हेंबर पासून राज्यभर चक्काजाम - आमदार भुयार

जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात असलेल्या कापूस, मका बाजरीच्या शेतीची खासदार दानवे यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिंदे, गट विकास अधिकारी कुलकर्णी, यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, जगन्नाथ पांगारकर, संजय जाधव, बाबासाहेब कोलते, आदी पदाधिकारीही उपस्थित होते. पुढे बोलताना दानवे म्हणाले, की ज्या गावचे पंचनामे झाले आहेत. त्या गावातील पंचनाम्याचे चावडीवर वाचन करावे. जेणेकरुन कोणताही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही. बहुतेक वेळा काही शेतकऱ्यांची नावे हे अनवधानाने राहून जातात. त्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी त्याचे नाव मदत करण्याच्या यादीत येत नाही, असे होऊ नये म्हणून गावामध्ये हे या पंचनाम्याचे वाचन करावे. सर्वांना याचा लाभ मिळावा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details