जालना- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांची मंगळवारी पाहणी केली. तसेच दानवेंनी पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
भोकरदन तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतामधील कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. मका, कपाशीच्या पिकांना कोंब फुटले आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याच्या बातम्या 'ईटीव्ही भारत'वर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत मंत्री रावसाहेब दानवेंनी नुकसान झालेल्या शेती पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.